मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच केला विजयाचा दावा
मोहोळ (प्रतिनिधी) - 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आ. श्री. यशवंत (तात्या) माने यांनी महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजनजी मालक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र राज्य ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष श्री. कल्याणराव आखाडे, भीमा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री. कल्याणराव बाप्पा पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन श्री. बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांचेसह महायुतीतील सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोच्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी बोलताना आ. श्री. यशवंत (तात्या) माने यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच आपला विजय निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन केले.