"विठ्ठल परिवाराबाबत चुकीचा संदेश देणाऱ्याना सडेतोड उत्तर दिले जाणार " - भगिरथ भालके

0


           पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमध्ये "विठ्ठल परिवाराबाबत चुकीचा संदेश विरोधक पसरवत आहेत. त्यांना सडेतोड उत्तर दिले  जाणार" असे विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल परिवाराच्या वतीने कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात होता. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.


       विठ्ठल परिवार हा एकजूट असून या विठ्ठल परिवाराची चुकीची माहिती काही विरोधक मतदारसंघांमध्ये पसरवीत आहेत. अशा विरोधकाला सर्वसामान्य जनतेने व कार्यकर्त्यांनी विरोध करावा. 

       पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आवताडे म्हणतात की, तीन हजार कोटी रुपये निधी आणून विकास केला. परंतु हा विकास कुठे दिसून येत नाही. अशी टीका देखील भगीरथ भालके यांनी आज रोजी केली. 

    नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर शहरातील तसेच अन्य गावांमधून आलेले फेरीवाले व रस्त्यावर बसून आपली दुकाने थाटणारे गोरगरिबांच्या वर अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांनी त्यांची रोजी रोटी हिसकावून घेण्याचे काम तत्कालीन प्रशासकांनी केले. परंतु या विरोधात आवाज आमदार अवताडे यांनी उठवलेलं नाही. या फेरीवाल्यांच्या व छोट्या मोठ्या दुकानदारांची बाजू घेऊन आम्ही प्रशासनाच्या विरोधात भांडलो. परंतु त्यावेळी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे मूग गिळून गप्प बसले होते. त्यांना या गोरगरीब लोकांच्या मताची आवश्यकता नाही असे वाटते. परंतु हेच सर्वसामान्य गोरगरीब जनता त्यांना येत्या विधानसभेमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सध्याचे लोकप्रतिनिधी या सर्वसामान्य जनतेला दुर्लक्षित करीत आहेत. 

    सध्या काही विरोधक हे काही दिवसापूर्वी मशिदीवर भोंगा लावला म्हणून भोंगा लावू नका म्हणणारे आज त्या विशिष्ट समाजाला अजमेरचे दर्शन घडवून देऊ लागले आहेत. असे दुटप्पी भूमिका विरोधक घेत आहेत. सर्वसामान्य जनता ही एवढी विसरभोळी नाही याची देखील जाणीव या विरोधकांना राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी नावाचा उल्लेख टाळत मनसे या पक्षावर केली.

     गेली 17 दिवस जन आशीर्वाद या अभियानाच्या अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेकडो गावांना गावभेटी चा उपक्रम केल्यानंतर या गाव भेटीच्या दरम्यान जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या जन आशीर्वाद अभियानाच्या अंतर्गत जनतेकडून येता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बदल आवश्यक आहे. हेच पहावयास मिळत होते.  मेळाव्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना  येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी मिळून एकजुटीने व आपले हेवेदावे विसरून एकजूटने काम करावे व आपल्या विठ्ठल परिवाराची सत्ता पुन्हा एकदा या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आणायची आहे असे भगीरथ भालके म्हणाले. 

    पंढरपूर शहरातील कोळी समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष बाबा अधटराव यांनी पंढरपूर मतदार संघामध्ये साडेचार हजार मतदान हे कोळी समाजाचे असून हे सर्व भगीरथ भालके यांच्या पाठीशी असणार आहे. अशी गावी ग्वाही त्यांनी दिली. 

     त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले की, भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरांमध्ये जास्तीचे लक्ष देण्यात यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

    विठ्ठल परिवाराच्या या विचार विनिमय सोहळ्यात उपस्थित 24 गावांमधील कार्यकर्ते, नेते मंडळी व पंढरपूर शहरातील कार्यकर्ते व नेते मंडळी ही उपस्थित होते. चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भोसे येथील गणेश पाटील, पंढरपूरचे नगरसेवक बाबा अधटराव, नगरसेवक सुधीर धोत्रे, महादेव धोत्रे, लखन चौगुले, सतीश आप्पा शिंदे, बालाजी मलपे आधी असंख्य विठ्ठल परिवार प्रेमी कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)