पुण्याकडे जाणाऱ्या बसला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात
प्रथमच S. T. छत्रपती शिवाजी महाराज चौक-सावरकर पुतळा-कराड नाका-लिंक रोड-के.बी.पी. कॉलेज या मार्गावरून टेंभुर्णी मार्गे स्वारगेटला
पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वारकरी भाविक प्रवासी यांचे सोईकरता पहाटे पाच पंचेचाळीस वाजता पंढरपूर-स्वारगेट ही बस सेवा मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर पासून ही बस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चालू करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर आगार, सोलापूर आगाराने वरील एसटी ही पंढरपूर बस स्थानकातून नियमित पहाटे पाच 45 वाजता निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर पुतळा, कराड नाका, लिंक रोड, के बी पी कॉलेज या मार्गावरून टेंभुर्णी मार्गे स्वारगेट पुण्याला जाणार आहे. तरी नागरिक प्रवासी वारकरी भाविक यांनी महामंडळाने सुरू केलेल्या एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वतीने करण्यात येत आहे. याच पद्धतीने सकाळी अकरा पंचेचाळीस वाजता स्वारगेट येथून पंढरपूर कडे सुटणारी बस वरील मार्गावरूनच येऊन परत पंढरपूर बस स्थानकात थांबणार आहे.
गेले अनेक दिवसापासून पहाटे होणारी वारकऱ्यांची गैरसोय तसेच रिक्षा चालकांची अरेरावी, वेळप्रसंगी आवाच्या सव्वा भाडे यामुळे भाविकांना, प्रवाशांना ना-इलाजास्तव खाजगी पुण्याकडे जाणाऱ्या गाडीकडे जावे लागत होते. या सर्व गोष्टीचा विचार करून व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी पाठपुरावा करून वारकऱ्यांच्या प्रवाशांच्या सेवेसाठी पंढरपूर-स्वारगेट ही बस उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चालू करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते आहे.