लायन्स क्लब सांगोल्याचे वतीने अन्नदान सप्ताह

0
सांगोला लायन्स क्लब कडून मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे अन्नदान सप्ताह

           सांगोला (प्रतिनिधी) - इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ ड १ माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे  मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे दि.१५ ऑक्टोबर २०२४ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अन्नदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
       आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संघटनेच्या प्रमुख पाच उपक्रमांपैकी Ralieving the Hungar  या अंतर्गत मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे दि.१५ ऑक्टोबर रोजी अन्नदान सप्ताहाच्या प्रथम दिवशी  लायन्स क्लब ऑफ सांगोला मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ला.अमोल गायकवाड, लायन्स कॅबिनेट ऑफिसर सी.ए.ला. उत्तम बनकर, ला. प्रा. धनाजी चव्हाण व 
 मातोश्री वृद्धाश्रम सांगोलाचे प्रमुख राहुल जाधव उपस्थित होते..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)