मंगळवेढयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम तसेच विविध विकास कामांचा कार्यारंभ
मंगळवेढा (प्रतिनिधी) - पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पहिल्या आमदारकीच्या कारकिर्दीत हजारो कोटींचा निधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामासाठी आणलेला आहे. आपल्या मतदारसंघातील विविध गावांमधील रस्ते, समाज मंदीर, पिण्याच्या पाण्याची सोय, संविधान भवन, मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना भेडसावणारा पाणी प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून एम आय डी सी ची मंजुर करुन आणण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, या प्रयत्नांना आलेले यश पहाता आमदार समाधान दादा आवताडे म्हणतात तेच बरोबर आहे." मी बोलतो कमी...पण काम करूनच दाखवतो".
आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास योजना, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तसेच तामदर्डी बंधारा, कर्जाळ कात्राळ, हुलजंती, पौट, निबोणी, नंदेश्वर, गोणेवाडी, ले. चिंचोळी N H 166 पर्यंत रस्ता. इत्यादी विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम आज दि. 7 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील लक्ष्मीदेवी टेकावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.