25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण, गुलदस्तातील मते उद्या येणार बाहेर...

0
निवडणूक  निकाल पाहण्यासाठी पंढरी संदेश न्यूज सोबत सक्रिय रहा

 गुलदस्तातील मते उद्या येणार बाहेर... 

               पंढरपूर :  पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.
      एका टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे. तसेच मतमोजणी कक्षात मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
         उद्या सकाळी आठ वाजले पासून मतमोजणी सुरुवात होणार आहे. प्रत्येक फेरीचा निकाल पाहण्यासाठी..... आघाडीवर असणारा उमेदवार कोण ? हे पाहण्यासाठी पंढरी संदेश न्यूज सोबत सक्रिय रहा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)