आ. समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरात कॉर्नर सभांचे आयोजन

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ पंढरपूर-मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार समाधान आवताडे प्रशांतराव परिचारक यांची जाहीर सभा पंढरपूर शहरातील सोन्या मारुती चौक दाळे गल्ली, नवशक्ती चौक इसबावी, गणेश नगर, आदी ठिकाणी संपन्न होत असून या कॉर्नर सभा करिता पंढरपूर शहर आणि विविध प्रभागातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

            विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामध्ये गाव भेट दौरे आणि सभांचा सपाटा लावला आहे. यामधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमदार समाधान अवताडे यांनी गावोगावी गावभेट दौरे, संवाद बैठका, संवाद यात्रा तसेच कॉर्नर सभा देखील घेतल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर शहरातील भाजप तसेच पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणा जोरदार राबवण्यास सुरुवात केली आहे.

         भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, सोमनाथ ननवरे, गोटू परचंडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलावर्ग यांनी अक्षरशा पंढरपूर शहर आणि तालुका पिंजून काढला आहे.

             भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरात कॉर्नर सभा घेण्यास सुरुवात केली असून त्याची सुरुवात आज शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता नवशक्ती चौक, इसबावी, 7 वाजता दाळे गल्ली, 8:30 वाजता गणेश नगर या ठिकाणी सभा संपन्न होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)