योगामुळे कार्यक्षमता वाढते - आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी

0
स्वेरीत पाचवा 'मासिक योग दिन' साजरा

          पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘नियमित योग केल्याने आपले मन प्रसन्न राहते. हाती घेतलेल्या कार्यात सकारात्मकता निर्माण होते, उत्साह वाढतो व आपल्या कार्य करण्याच्या क्षमतेत कमालीची वाढ होते.’ असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी यांनी केले.
         प्रत्येक वर्षी दि.२१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थात जगभरात साजरा केला जातो. दि.२१ जून रोजी स्वेरीत मुख्य ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी यापुढेही ‘स्वेरी अंतर्गत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दि.२१ तारखेला सामुहिक ‘योग दिन’ साजरा करण्याचे घोषित केले होते. तेंव्हापासून प्रत्येक महिन्याच्या दि. २१ तारखेला न चुकता स्वेरीत ‘योग दिन’ घेतला जातो. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर २०२४ हा स्वेरीमध्ये ‘पाचवा योग दिन’ साजरा करण्यात आला.
          अभियांत्रिकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पीएल (पेपर लिव्ह) निमित्त सुट्टी आहे तरीही यामध्ये खंड न पडता ‘योगा’ घेण्यात आला. या उपक्रमाला प्रथम वर्ष अभियांत्रिकी व वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. डॉ.एन.पी. कुलकर्णी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रार्थनेने सुरवात करून साध्वी तत्वमयी यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांच्याकडून पुढे तासभर विविध प्राणायाम करवून घेतले. सूर्यनमस्कार सह विविध आसने, भस्रीका प्राणायम तसेच श्वास, फुफुस्से, शरीराच्या विविध अवयवांच्या हालचालीसाठी योगाचे विविध प्रकार करून घेतले. या योग सरावानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर अधिक उत्साह दिसून येत होता. मार्गदर्शन करताना अनुयायी साध्वी तत्वमयी पुढे म्हणाल्या की, ‘योग हा शरीर, स्वास्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेबरोबर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम करुन घेतो. त्यामुळे मन, शरीर आणि आत्मा संतुलित राहण्यासाठी नियमित योगाची गरज आहे तसेच ध्यान केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. नियमितच्या कामामुळे नकळत ताण- तणावामुळे मनाची अवस्था बदलते. म्हणून मानसिक शांतीसाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे.’ असे सांगून ‘योगा’ चे फायदे सांगितले. सदरचा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)