आज पर्यंत झालेल्या कित्येक विधानसभा निवडणूक मध्ये या आजी माजी आमदारानी मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पाण्याचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे. बेरोजगार युवकांना हाताला काम मिळावे म्हणून एम. आय. डी. सी. आवश्यक असताना या बाबतीत येथील नेत्यांनी राजकारण केले गेले. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंढरपूर येथे एम. आय. डी. सी. ची मंजूरी दोन वर्षापूर्वी आणली. परंतु येथील नेत्यांनी याला खो घालण्याचे काम करण्यात आले. आता आम्ही एम. आय. डी. सी. आणली म्हणून ते निवडणूक च्या प्रचारात सांगत आहेत. अशा संधीसाधू विरोधकाला घरी बसवले पाहिजे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मनसेला निवडून द्यावे असे आवाहनही दिलिप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मंगळवेढा तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे या भागातील मुले शैक्षणिक गुणवत्ता व उच्च शिक्षणासाठी अन्यत्र जात आहे. या मंगळवेढा तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय मनसेच्या माध्यमातून केली जाणार आहे. युवकांना आय. टी. पार्क ची सोय, उद्योग धंदे, कारखाने इ. युवकाच्या हाताला काम देणारे ऊद्योग मनसे च्या वतीने उभे केले जाणार आहे.
महिलांना घरात बसून गृह उद्योग साठी मदत व सोय करणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनता महिला, युवक, ज्येष्ट नागरिक यांचा पाठींबा आमच्या पाठीशी आहे. या निवडणकींमध्ये विजय आमचाच होणार आहे. मनसे या पक्षाला मतदार दिलसे मतदान करणार आहेत अशी माहिती मनसे चे उमेदवार दिलिप बापू धोत्रे यानी दिली.