मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावरच विजय निश्चित - समाधान आवताडे

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने ज्या काही कल्याणकारी योजना जाहीर केल्या त्या योजनेची अमलबजावणी करण्याचे काम आम्ही पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात केले आहे. असे भाजपाचे उमेदवार समाधान दादा आवताडे आज कोर्टी येथील महादेवाच्या मंदिर परिसरात आपल्या प्रचार सभेत बोलत असताना आपल्या भाषणात मधून आपण केलेली विकास कामेही सांगितले.

        या प्रचार सभेला प्रशांत परिचारक, कृषीउत्पन बाजार समितीचे अध्यक्ष हरिषदादा गायकवाड, व अन्य नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

      आपल्या प्रचारसभेत समाधान आवताडे यांनी संपूर्ण मतदार संघातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, तामदर्डी बंधाराचे काम, चौवीस गावाचा पाणी प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही केले आहे. पंढरपूर तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून एम. आय. डी. सी. ला मंजूरी आणून त्यासाठी लागणारी जमीन आणि निधी मंजूर केला आहे.

       या मतदारसंघातील सर्व रस्ते हे मोठ्या महामार्गाला जोडले गेले आहेत. ग्रामीण भागातील वाड्यावस्ता वरील रस्ते बनवले आहेत. शेतीमाल बाजारात नेण्यासाठी अडचण येत होती. रस्ते तयार केल्यामुळे शेतकरी आपला शेतमाल बाजारात नेण्याची सोय करून दिली आहे. शेतकऱ्यांना वीजबील माफ करून दिलासा देण्याचे काम आम्ही केले आहे. मला मिळालेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये मी तीन हजार कोटींचा निधी आणून विकास कामे केली आहेत. आणि अन्य कामे मार्गी लावण्याचे काम आम्ही केले आहे. मला पुन्हा एकदा निवडून दिल्यास दुप्पट निधी आणला जाईल. आणि मतदार संघाचा दुप्पट विकास केला जाईल. महाराष्ट्रातील एक नंबरचा मतदारसंघ केल्याशिवाय राहणार नाही. याची ग्वाही देत आहे. असे कोर्टी येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)