पंढरपूर शहरात अनिल दादा सावंत यांनी घेतली प्रचारात आघाडी

0
           पंढरपूर  (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील उमेदवार अनिल सावंत यांनी आज रोजी पंढरपूर शहरातील सरगम चौक या औद्योगिक वसाहती मधून त्यानी आपल्या पक्षाची तुतारी हे चिन्ह घेऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे.

    अनिल दादा सावंत यानी पंढरपूर शहरामधून प्रचाराला सुरवात केल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. प्रचारात शहरामधून आघाडी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. औद्योगिक वसाहती मधील व्यापारी वर्ग व कामगार वर्ग अनिल सावंत याच्या स्वच्छ प्रतिमा व माळकरी विठूरायाचा भक्त म्हणून या व्यापारी व कामगार वर्गात ओळख झाल्यामुळे सर्व मतदार आम्हांला चांगला लोकप्रतिनिधी मिळणार या भावनेने त्यांचे स्वागत सर्वत्र होत आहे.
     एक स्वच्छ प्रतिमा व राजकारणातील कोरी पाटी म्हणून त्याची ओळख ही अनिल दादा सावंत यांना विजयी करणार अशी चर्चा त्यांनी या औद्योगिक वसाहत, कुभार गल्ती, कैकाडी मठ, अनिल नगर, जुनी पेठ या परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
     वरील भागात प्रचार करीत असता येथील नागरिकांनी, महिलानी या भागात नागरी सुविधा उपलब्ध नाहीत, रस्ते नाहीत अशा अडचणी सांगितल्या. या सर्व अडचणी, समस्या मी सोडवणार फक्त एकदा मला सेवा करण्याची संधी द्या मी संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. असे वचन उमेदवार अनिल दादा सावंत यांनी याभागातील मतदारांना दिले.
    या प्रचार फेरीत माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, शिवसेना नेते सुधीर अभंगराव, संदीप माडवे, सुधीर भोसले, विश्वजित भोसले व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)