आम आदमी पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला अनिल सावंत यांना पाठिंबा

0
मतदार संघातील वाढत्या पाठींब्यांनी अनिल सावंतांचे पारडे जड 

            मंगळवेढा (प्रतिनिधी) - मंगळवेढा तालुक्यातील आम आदमी पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मा. एकनाथ फटेजी, मंगळवेढा जिल्हा उपाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बाबरजी, मंगळवेढा शहराध्यक्ष मा. भारत शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिला. 

         आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने ईडी सीबीआयचा गैरवापर करून तुरुंगात टाकले. संजय राऊत, अनिल देशमुख यारख्या एकनिष्ठ आणि निष्पाप नेत्यांनाही जेलमध्ये टाकले. उद्या भाजप सत्तेत राहिले तर तुमचे दुकान कधी बंद करायचे, आणि कधी चालू करायचे, हे भाजपवाले ठरवतील. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येणे फार आवश्यक असल्याचं सांगत आपण ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वास तालुकाध्यक्ष एकनाथ फटे साहेबांनी व्यक्त केला.

          अनिल सावंत यांच्या रूपाने मिळालेल्या नव्या चेहऱ्याने मतदार संघातील नागरिक आकर्षित होत आहेत. अनिल दादांचे मार्गदर्शनाखालीच मतदारसंघाचा कायापालट होईल असे मत आपच्या नेत्यांनी यावेळी बोलून दाखविले.
        कोणत्याही भूल थापानां बळी न पडता महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांना तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आव्हान आम आदमी पक्ष मंगळवेढा यांचे वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)