आपल्या नेत्यांना झुलवत ठेवणार्या भाजपा या पक्षावर राग काढण्याची हीच संधी आहे आम्हाला व शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणूक मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी कोर्टी या गावी केले.
या प्रचार सभेला जिल्हा संघटक सुधीर भोसले, नागेश फाटे, कासेगाव चे नेते वसंत नाना देशमुख, मुलाणी, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या प्रचार सभेत पुढे बोलत असता ते म्हणाले भाजपाने जाती जातीत द्वेष पेरण्याचे काम केले आहे. महागाई वाढवून गोरगरीबाचे कंबरडे मोडले आहे. भाजपाच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. लाडकी बहिण योजना द्वारे पैसे देऊन त्या पाठीमागे या सरकारने शंभर रुपये असलेले तेल दीडशे रुपये वर नेऊन ठेवले असे पैसे दिले आणि महागाई वाढवून काढून घेतले. अशा फसव्या सत्तेला खाली खेचले पाहिजे. आपला विरोधक हा भाजपा पक्ष आहे. या सत्तेची मस्ती व मनमानी येत्या वीस तारखेला भाजपा विरोधात मतदान करुन महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजयी करा असे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांनी कोर्टी ग्रामस्थाना केले.