मतदार संघात आ. समाधान आवताडे यांना वाढता पाठिंबा
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांमुळे भाजप व समाधान आवताडे यांना विविध संघटना व पदाधिकाऱ्यांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे.
पंढरपुरातील नगरसेवक लखन चौगुले, धनुभाऊ धोत्रे, रामा चौगुले, श्रीकांत चौगुले, दीपक चौगुले आदी कार्यकर्त्यांनी आमदार समाधान दादा आवताडे साहेब व भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश आवताडे शुगर अँड डिस्टिलरीजचे चेअरमन व नामवंत उद्योजक श्री. संजयजी मालक आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये झाला.