पंढरपूर (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन पावर लिफ्टिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयास घवघवीत यश मिळाले. ही पावर लिफ्टिंग स्पर्धा शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 37 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे सात विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी झाले यामधील खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
अनिश गांडुळे या खेळाडूने105 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
76 किलो वजनी गटात कुमारी चंद्रिका बाबर बीएससी भाग दोन हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
पवन रुपनवर याने 96 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
त्याचबरोबर श्रवणकुमार अवताडे 83 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला
या सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. अनिल चोपडे, डॉ. उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य,शिक्षक कर्मचारी यांनी केले. तसेच या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, विठ्ठल फुले, आणि मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.