अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे यश

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयास घवघवीत यश मिळाले. ही कुस्ती स्पर्धा के. एन. भिसे. महाविद्यालय, मोडनिंब येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 29 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे नऊ खेळाडूं विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधील खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 
             कु. दिव्यसाक्षी धोत्रे या खेळाडूने 54 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
            76 किलो वजनी गटात कु. चंद्रिका बाबर बीएस्सी भाग दोन हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 
                त्याचबरोबर जयदीप पवार 56 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
                 या सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, डॉ. तुकाराम अनंतकवळस डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत,  डॉ. अनिल चोपडे, डॉ. उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य, शिक्षक कर्मचारी यांनी केले. तसेच या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, विठ्ठल फुले, आणि मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)