विदुषी गौरी पाठारे, पं.मुकुल कुलकर्णी, पं. संजय गरूड आणि पं. रांजेंद्र कुलकर्णी आंतरराष्ट्रीय गायक वादकांची उपस्थिती
आरती प्रांगण भक्ती मार्ग येथे सायं. ६ वा. दोन दिवसीय संगीत महोत्सव
पंढरपूर (प्रतिनिधी) - पं.विकास कशाळकर फाऊंडेशन पंढरपूर यांचे वतीने शनिवार, रविवार दिनांक २८-२९ डिसेंबर रोजी आरती प्रांगण भक्ती मार्ग येथे सायंकाळी ६:०० वा.दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी, सचिव ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.
गेल्या १३ वर्षांपासून अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि नवोदित आणि ख्यातनाम गायक गायिका यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या फाऊंडेशनची स्थापना होत असताना या आधीही स्वरयज्ञा बरोबर ख्यातनाम गायक गायिका यांचे गायन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असतानाच कोरोनानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ख्यातनाम गायक गायिका आणि वादकांच्या उपस्थितीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता ख्यातनाम बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन, तबला साथ ऋषिकेश सुरवसे आणि पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे करणार असून दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक संजय गरूड पुणे यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना तबला रोहन पंढरपूरकर आणि हार्मोनियम तुषार केळकर, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे करणार असून दुसऱ्या दिवशी रविवारी पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक पं. मुकुल कुलकर्णी यांचे गायन त्यांना तबला ऋषिकेश सुरवसे, हार्मोनियम श्रीरंग जाकी करणार आहेत तर दुसऱ्या सत्रात ख्यातनाम गायिका गौरी पाठारे यांचे गायन त्यांना तबला पुष्कराज जोशी तर हार्मोनियम सुप्रिया जोशी करणार आहेत. यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणार असून दोन्ही दिवसांचे कार्यक्रम विनामूल्य असून पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलासाधक आणि रसिकांना विनंती आहे की आपण बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रसाद कुलकर्णी, ज्ञानेश्वर दुधाणे, माधूरीताई जोशी, उदय उत्पात, एस. पी. कुलकर्णी, आण्णासाहेब सुरवसे, राजेश खिस्ते, स्वानंदी काणे, धनंजय मनमाडकर, प्रज्ञा कुलकर्णी तसेच विशेष सहकार्य सिध्देय पुरवत आणि तुकाराम कोळी यांचे मिळत आहे. संगीत प्रेमी अधिक परिश्रम घेत आहेत.