स्वेरीमध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘आधुनिक भारताच्या उभारणीचे शिल्पकार असलेले माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी आयोजिलेल्या आर्थिक धोरणामुळे भारत देश आज जगात एक आर्थिक महासत्ता म्हणून उभा राहत आहे. कै. डॉ.मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आणि अविस्मरणीय असे आहे. डॉ. सिंग यांच्या रूपाने भारताने आज एक मुत्सद्दी अर्थतज्ञ गमावला आहे.’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षा श्रीमती मंजुषा मिसकर यांनी केले.
भारताचे माजी पंतप्रधान व जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे स्वेरीमध्ये जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षा श्रीमती मंजुषा मिसकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती मंजुषा मिसकर ह्या मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या एका महत्वाच्या सहविचार सभेच्या संदर्भात स्वेरीत उपस्थित होत्या. यावेळी त्या श्रद्धांजली पर भाषणात भारताचे माजी पंतप्रधान कै. डॉ.मनमोहन सिंग यांच्या कार्यावर प्रकाश टाकत होत्या. प्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. स्वाती हवेली, सोलापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी सुर्वे, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एम.पी.ठाकरे, प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर. गिड्डे, पब्लिसिटी व प्रोटोकॉल अधिष्ठाता डॉ. डी.एस.चौधरी, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.के. बी. पाटील, प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. ए.ए.मोटे, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एस.पी.पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी.भोसले, वर्कशॉप इन्चार्ज प्रा. बी. डी. गायकवाड, प्रा. डी.टी.काशीद, प्रा. एस.एस. गायकवाड, प्रा.विक्रम चव्हाण, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. ए. एस. भातलवंडे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी अमोल रोंगे, बालाजी सुरवसे, अमोल रोंगे आदी उपस्थित होते.