पंढरपूर (प्रतिनिधी) - लायन्स क्लब पंढरपूर यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नंदकुमार होडगे व परिवार (व्यापारी) वेळापूर हे उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने करण्यात आले. दिव्यांग दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये धावणे, उभे राहून लांब उडी, पासिंग द बॉल, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर करण्यात आला.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून श्री. नंदकुमार होडगे वेळापूर यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ कै. सुशीला गजानन होडगे अंधशाळेतील मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याकरिता व मनोरंजनासाठी उपयुक्त असणारा एलईडी टीव्ही शाळेस भेट दिला.
सदरच्या कार्यक्रमासाठी सौ. सुनंदा नंदकुमार होडगे, कु.वृंदा श्रीनिवास होडगे, कु.वेणू श्रीनिवास होडगे, मिलिंद प्रतापराव होरा, किरण बलभीम उरणे, अमोल दत्तात्रय मंडलिक इत्यादी उपस्थित होते.
होडगे यांनी मनोगतामध्ये बोलताना शाळेच्या कार्याबद्दल कौतुक केले आणि मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व अशीच माझे सर्वतोपरी सहकार्य आपल्या शाळेस राहील याची ग्वाही दिली. आईच्या आठवणीमध्ये ते भाऊक झाले होते. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पाहुण्यांनी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. सदरच्या कार्यक्रमा प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश म्हेत्रे सर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार सौ. कुलकर्णी मॅडम व श्री. कटप सर यांनी मानले.