सोलापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजे एमकेसीएलच्या वतीने केला जाणारा उत्कृष्ट व्यावसायिकता व प्रवेशाचा अवार्ड यंदा सलग 17 व्या वर्षी एनआयटी कॉम्प्युटरला मिळाला.
डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCL ची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळेस एनआयटी कंप्यूटरच्या वतीने सेंटर हेड श्री. गणेश जाधव व श्री. शाम गोगाव यांनी हा पुरस्कार MKCL च्या व्यवस्थापकीय संचालिका मा. वीणा कामत मॅडम यांचे हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
MS-CIT या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत रौप्य महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा एन आय टी कॉम्प्युटर्सला पुरस्कृत करण्यात आल्यानं एन आय टी कॉम्युटर मागील 23 वर्षा पासून राबवित असलेल्या विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रशिक्षण शासनाकडून आलेले वेगवेगळे प्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थी व गरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना केलेले सहकार्य व आजपर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेल्या विश्वास याबद्दल पुन्हा एकदा एमकेसीएल कडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी लोकल लीड सेंटरचे श्री. रोहित जेऊरकर, श्री हारून शेख, विभागीय समन्वयक श्री महेश पत्रीके, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे श्री अमित रानडे, श्री अतुल पतौडी, श्री कुंभार, श्री कौशल, डॉ दीपक पाटील, श्री कटकधोंड, आदी उपस्थित होते.