जय महाराष्ट्र युवा मंच व रुक्मिणी प्रतिष्ठान आयोजित किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

0
जय महाराष्ट्र युवा मंच व रुक्मिणी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम


         पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. जय महाराष्ट्र युवा मंच तर्फे आयोजित किल्ला स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाराष्ट्र युवा मंचचे संस्थापक श्रीराम साळुंखे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुहासिनी डेअरीचे मालक आणि प्रसिद्ध व्याख्याते शशिकांत कराळे सर उपस्थित होते.

          या प्रसंगी आपल्या भाषणात श्री. शशिकांत कराळे यांनी मंचाच्या कार्याचे कौतुक केले तसेच दुर्गप्रेमींना प्रेरणा देवून दुर्ग संवर्धनाचे महत्व आपल्या ओघवत्या शैलीत विषद केले. याप्रसंगी व्यक्त होताना त्यांनी सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धक यांचे अभिनंदन करून भावी काळात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
        प्रास्ताविकात ऍड. सोहम व्होरा यांनी विविध दुर्ग प्रकारांची माहिती, पर्यावरणीय दृष्टीने गडकोटाचे संरक्षण तसेच दुर्ग संवर्धनाच्या कार्याची गरज या विषयावर संवाद साधून गडप्रेमींना बहुमोल मार्गदर्शन केले. यानंतर सर्व विजेते तसेच सर्व सहभागी यांचा प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
 
           सदर किल्ला स्पर्धा ही शालेय गट, महिलांसाठी हिरकणी गट, खुला गट आणि सांघिक गट अश्या चार गटात आयोजित केली होती. किल्ले बांधणी, पर्यावरणपूरक सजावट आणि गडकिल्ले विषयाचे ज्ञान यांच्या आधारे या किल्ल्याचे परीक्षण करण्यात आले. परीक्षक म्हणून सोहम व्होरा, श्रीराम साळुंखे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रुक्मिणी प्रतिष्ठानचे श्रीकृष्ण साळुंखे, जय महाराष्ट्र युवा मंचाचे श्रीराम साळुंखे,  मनीष कुलकर्णी, हेमंत विभते आणि इतर सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले. 

किल्ला स्पर्धा २०२४ चे पारितोषिक वितरण पुढील प्रमाणे :-

खुला गट :- 
प्रथम क्रमांक:- अभिषेक कुलकर्णी
द्वितीय क्रमांक:- स्वानंद कुलकर्णी
तृतीय क्रमांक :- श्रेयस बडवे

हिरकणी गट :-
प्रथम क्रमांक :- श्वेता घाडगे
द्वितीय क्रमांक:- ऐश्वर्या कुलकर्णी
तृतीय क्रमांक:- कार्तिकी कुलकर्णी 

शालेय गट :-
प्रथम क्रमांक:- दुर्वांकुर बेणारे
द्वितीय क्रमांक:- ओम बडवे
तृतीय क्रमांक:- अवधूत महाजन

सांघिक गट :-
प्रथम क्रमांक:- शिवप्रेमी १० ग्रुप
द्वितीय क्रमांक:- संकल्प प्रतिष्ठान
तृतीय क्रमांक:- शिवाज्ञा ग्रुप, चळे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)