कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व कलोत्सव २०२५ चे आयोजन

0
वक्तृत्व स्पर्धा व कलोत्सव २०२५ चे आयोजन

               पंढरपूर (प्रतिनिधी) - गेली १७ वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून प्रतिवर्षी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  वक्तृत्त्व स्पर्धेचे व कलोत्सव २०२५ च्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 
          सदर स्पर्धा विविध शालेय गटात घेतल्या जाणार आहेत. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सदर स्पर्धा दिनांक २२ व २३ जानेवारी २०२५ रोजी पांडुरंग भवन, कालिका देवी चौकाजवळ संपन्न होणार आहेत. 
वक्तृत्त्व स्पर्धेचे विषय व गट पुढील प्रमाणे-
          अ गट--इयत्ता १ ली ते ४ थी
१) माझी आवडती सहल  २) माझी ताई   ३) मला आवडलेली स्वामी विवेकानंदांची
     गोष्ट
४) माझी शाळा  ५) माझी बाग 
६) माझा आवडता प्राणी
      ब गट--इयत्ता ५ वी ते ८ वी
१) माझा आवडता कवी २) मातृभक्त विवेकानंद  ३) शिवरायांचा गनिमी कावा
४) देशभक्त भगतसिंग ५) माझा आवडता छंद ६) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पद्मभूषण कै. झाकीरभाई हुसेन
        क गट - इयत्ता ९ वी ते १२ वी
१) विज्ञाननिष्ठ स्वातंत्र्यवीर सावरकर २) उदंड झाले पुरस्कार ३) मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व ४) रतनजी टाटा एक आदर्श उद्योजक ५) सातासमुद्रापार स्वामी विवेकानंद  ६) शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु  ७) जीवनाला आकार देणारी कला. 
तसेच या सोबतच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विविध वेशभूषा याही स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
          सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, ज्ञानेश्वर मोरे, अमरसिंह चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय अनिरुद्ध बडवे, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, जगदीश खडके, राजकुमार आटकळे, बसवराज बिराजदार, महेश अंबिके, भिमराव औसेकर, विष्णुकांत बोंबलेकर , अमृतभाई शहा, अनंता नाईकनवरे, महेश देशपांडे, नारायण बडवे, सौ. मंदाकिनी देशपांडे,  डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, सौ. प्रतिभा यादव, सौ. आरती बोरखेडकर, सौ. वैष्णवी देशपांडे,  सौ. गौरी देशपांडे, सागर विश्वासे सर, आदी कलासाधनाचे सदस्य विशेष प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)