पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या कडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकाल ९३ टक्के इतका लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक प्रतिक्षा लक्ष्मण सोनवाले, व्दितीय क्रमांक विश्वजित अर्जुन शिवशरण तर तृतीय क्रमांक प्रथमेश अर्जुन खाडे यांनी मिळवला आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी म्हणाले की, कर्मयोगी जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचे हे पहिलेच वर्ष असून प्रथम वर्षा मधेच महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. सुसज्ज लॅब, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणारा नियमिय अभ्यास व वैयक्तिक लक्ष हेच या यशामागचे गमक आहे असे सांगून त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
श्री पांडुरग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.