पंढरपूर (प्रतिनिधी) - सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले ते श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या ७१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, शोभाताई काळुंगे मॅडम, भागवत चवरे महाराज, कीर्तनकार ह.भ. प.सोनाली दीदी करपे, विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील, गणेश पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, कृषी व समितीचे चेअरमन विलासराव काळे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, रुपेश वसंत पवार, शोभाताई पवार, सारिकाताई प्रमोद निर्मळ व काळे परिवारातील सर्व सदस्य नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे औसेकर महाराज म्हणाले की आईच्या प्रेमा इतकं निखळ आणि निरागस प्रेम दुसरं कोणतंही नसून आईच्या आशीर्वादाने लाखो कार्य मार्गी लागतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विठ्ठल रुक्मिणीची महापूजा काळे कुटुंबीयांच्या शुभहस्ते आज पहाटे संपन्न झाली हा योगायोग आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आल्याचेही अवसेकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने सद्गुरु कल्याण स्वामी संस्था, श्री क्षेत्र चकलांबा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार सोनाली दीदी करपे यांनी आपल्या कीर्तनात मातृ सेवा ही ईश्वर सेवा असून आईच्या सेवेमधून मिळणारे पुण्य हे मौल्यवान असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कल्याण काळे म्हणाले की, सहकार शिरोमणी वसंतदादांच्या आकस्मित जाण्याने आलेले दुःख बाजूला ठेवून आईने आईची माया देण्याबरोबरच वडिलांचे प्रेमही आम्हा सर्व काळे कुटुंबीय व नातेवाईकांना दिले. अनेक अडचणींचा सामना करत असताना प्रोत्साहन देऊन आईच्या आशीर्वादामुळेच लढण्याचं बळ मिळत असल्याचे सांगितले.
या किर्तन सेवेसाठी भंडीशेगाव, सुपली, उपरी, शेळवे, दसुर, पिराचीकुरोली, बाभुळगाव कौठाळी, धोंडेवाडी वाडीकुरोली गावातील समस्त भजनी मंडळी व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, निशिगंधा सहकारी बँक, वसंतराव काळे शैक्षणिक संकुल, सुप्रभात मित्र मंडळ,यशवंत व प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, वसंतदादा मेडिकल फाउंडेशन सहकार शिरोमणी परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व पंढरपूर तालुक्यातील विविध गावचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर, काळे कुटुंबाचे सर्व नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार काळे परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी मानले.