शुभांगीताई मनमाडकर पंढरी नगरीतील भजनानंदाच भक्तीपीठ - डॉ. जयवंत महाराज बोधले
शुभांगीताई मनमाडकर यांना ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याला पंढरपूकरांचा शुभेच्छांचा वर्षाव
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीक्षेत्र पंढरपूर नगरीतील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व शुभांगीताई मनमाडकर यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सुरुवातीला विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन ख्यातनाम संत साहित्य अभ्यासक डॉ. कल्याणीताई नामजोशी, डॉ ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, शुभांगी ताई मनमाडकर, भगवानराव मनमाडकर, कृष्णामाई पटेल, निरंजन महाराज मनमाडकर, धनंजय मनमाडकर, पल्लवी मनमाडकर, आरती मनमाडकर, विद्या सांगळे, ज्ञानेश्वर दुधाणे आदींच्या शुभहस्ते झाल्यानंतर अभिष्टचिंतन सोहळ्याला सुरुवात झाली.
प्रास्ताविकात निरंजन महाराज मनमाडकर यांनी अभिष्टचिंतन सोहळा का करायचा व आयोजनाची संकल्पना सांगितली. सुरुवातीला मान्यवरांच्या सत्कारानंतर शुभांगीताई मनमाडकर यांची साखर तुला आणि ६१ दिव्यांनी औक्षण झाल्यानंतर एकसष्टीनिमित्त सत्कार कल्याणीताई नामजोशी यांच्या शुभहस्ते आणि पंढरपूरकरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर जयवंत महाराज बोधले यांच्या अभिर्वाचनाला सुरुवात झाली त्यांनी पंढरपूरमध्ये मनमाडकर परिवाराचं अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सांगितिक क्षेत्रातील योगदानाचा महत्त्व विशद करताना सांगितले की, दादा महाराज मनमाडकर गयामाता मनमाडकर यांचीही वारकरी परंपरा टिकवण्याचं काम मनमाडकर परिवार अतिशय यशस्वीरित्या सुरू ठेवलेल आहे याचा पंढरपूरकरांना अभिमान वाटतो. सत्कार हे दोन प्रकारचे असतो त्यामध्ये केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि केलेल्या कार्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या दोन्हींचा संगम शुभांगीताई यांच्यामध्ये असताना त्यांनी आयुष्यभर भजनामध्ये आणि ध्यानामध्ये तल्लीन राहून इतरांना आध्यात्मिक सुखाचा आनंद देत आहेत त्यानंतर ताईंच्या सखी कृष्णामाई पटेल, माधूरीताई जोशी, चंदाताई तिवाडी, गौरी अमळनेरकर, रमेश घळसाशी यांनी आपल्या मनोगतामध्ये शुभांगी ताईंच्या आठवणी आणि कार्याचा गौरव सांगत वातावरण भुतकाळात घेऊन रंगत आणली.
शुभांगीताईंनी आपल्या मनोगतातून सदैव शेवटच्या श्वासापर्यंत भजनाचा आणि ध्यानाचा आनंद सर्वांमध्ये निर्माण करायचा आहे.आणि आपलं प्रेम आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्यात असे सांगून, अध्यक्षीय मनोगतात सौ. कल्याणीताई नामजोशी यांनी मनोगतातून पंढरपूरकर यांच्या विषयी आधीपासूनच खूप जिव्हाळ्याचे संबंध असताना आज शुभांगीताई मनमाडकर यांच्या अभिष्टचिंतन निमित्त पंढरपूरला येऊन खूप आनंद वाटला आणि सत्कार हा कार्याचा होत असतो.आणि आपलं कार्य परंपरागत असल्याचे गौरवोद्गार सांगत वेदांतामधील त्यांचे अभ्यासपूर्ण मनोगत आणि त्यामधील मनुष्याच्या जीवनातील जगण्याचे टप्पे सांगताना उपस्थितांना ऐकतच रहावे असे वाटत होतं.त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या सुमधुर भजनाचा सर्व रसिकांनी मनोसोक्त आनंद घेत जय जय राम कृष्ण हरी, भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा, केतकी गुलाब, कानडा राजा पंढरीचा, माझे माहेर पंढरी, रसिकांच्या आग्रहास्तव घेई छंद मकरंद आणि ठुमरी गात शेवटी लय नाही लय नाही मागणं याने सांगता केली. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला श्रीहरी भगुरे, हार्मोनियम कार्तिकी गाडगे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, निवेदन गणेश गाडगे, टाळ माऊली खरात यांनी केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश खिस्ते यांनी सुंदर करत आभार ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मानले. यावेळी पंढरपूर मधील सर्व नामांकित महाराज मंडळी, सर्व क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. शेवटी सुरुची भोजनाची व्यवस्था ही सुंदर करत अविस्मरणीय क्षणाची अनुभूती सर्व पंढरपूरकरांनी घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अधिक परिश्रम घेतले.