सोलापूर (प्रतिनिधी) - रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत सावळेश्र्वर टोल नाका येथे वाहनचालकांसाठी हेल्मेट वाटप आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन TVS CREDIT SERVICES LTD, सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
महामार्ग पोलीस अधिकारी एपीआय आनंद थिटे यांनी या प्रसंगी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, "रस्त्यावरील सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर आणि इतर वाहतूक नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे."
टीव्हीएसच्या वतीने गोविंद सुरवसे, अनिल शिंदे, विशाल इरशेट्टी यांसारख्या काही वाहनधारकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात TVS CREDIT चे रिजनल मॅनेजर कौस्तुभ देवधर, एरिया मॅनेजर मशाक मुल्ला, ब्रांच मॅनेजर रणजीत, डॉ. ऋषिकेश जावळे यांच्यासह महामार्ग पोलीस कर्मचारी, नागरिक आणि सावळेश्र्वर टोल नाका कर्मचारी उपस्थित होते.