कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर क्रिकेट संघाचा दणदणीत विजय व रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील (स्वायत्त) महाविद्यालयाने दणदणीत विजय मिळवला. ही स्पर्धा संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे सुरू आहे. या अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील सामना क्रमांक ७- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर विरुद्ध संगमेश्वर रात्र महाविद्यालय, सोलापूर, या सामन्यामध्ये टॉस जिंकून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल ३५० धावा जमवल्या. यामध्ये अथर्व देशमाने २ धावा,ओंकार कदम २० धावा, कुणाल परचंडे २५ चेंडूत ४९ धावा,ओंकार रोकडे ३ धावा व या व्यतिरिक्त दोन दोन खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करत शतकवीर ठरले यात मारुती कांबळे ४१ चेंडूत ११४ धावा व प्रवीण वाघमारे ३८ चेंडूत १३८ धावा. अशा एकूण ३५० धावांचा डोंगर उभा केला.
         या सामन्यातील विशेष बाब म्हणजे मर्यादित २० षटकाच्या सामन्यातील जास्त धावा बनवण्याचे जागतिक रेकॉर्ड हे २० षटकात ३४९ धावा जमवण्याचे बडोदा संघाचे आहे. परंतु या जागतिक रेकॉर्डला मोडण्याचे काम आज अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने केले. याचे सर्व श्रेय मारुती कांबळे व प्रवीण वाघमारे यांना जाते. व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने गोलंदाजी करताना संगमेश्वर रात्र महाविद्यालयाला फक्त ९७ धावांमध्ये सर्व गडी बाद केले. यात अथर्व देशमाने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ फलंदाज बाद केले, नंदकुमार जाधव - २ गडी, श्रेयश शिंदे- १ गडी, तर आशिष मस्के-१ गडी बाद केला. हा सामना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांनी २५३ धावांनी जिंकला.
            या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, डॉ. तुकाराम अनंतकवळस, डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत,  डॉ. अनिल चोपडे, डॉ. उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य, शिक्षक कर्मचारी यांनी केले. तसेच या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, विठ्ठल फुले, आणि मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)