पंढरपूर (प्रतिनिधी) - भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजुर रोहिदास किसन पवार यांचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या वारस पत्नी शिला रोहिदास पवार यांना रुपये तीन लाखाचा चेक कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपट घोगरे, डेप्यु.जनमॅनेजर, कैलास कदम, टेक्निकल जनरल मॅनेजर पी.टी.तुपे, प्रोडक्श्न मॅनेजर व्ही.डी.आडत, चिफ अकौंटंट बबन सोनवले, शेती अधिकारी पी.आर.थोरात, हेड टाईम किपर संतोष काळे उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व मा.संचालक मंडळ यांनी ठरविलेल्या धोरणानुसार कारखान्याचे सर्व सभासद, ऊस तोडणी शेतमजुर, वाहतुकदार इत्यांदीच्या हिताचा विचार करुन, दुर्देवाने अपघात होवुन, मयत झालेल्या कुंटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी दरवर्षी कारखान्यामार्फत सभासद, कामगार, ऊस वाहतुकदार, ऊस तोडणी शेतमजुर, बैलजोडी, झोपडी इत्यादींचा अपघात विमा दि न्यु.इंडिया इन्श्युरन्स् कंपनी यांचेकडून उतरविण्यात येत असून, सदर विमा हप्त्याची रक्कम कारखान्यामार्फत भरण्यात येते.
मागील गळीत हंगाम 2023-24 मध्ये देऊळगांव जि.बुलढाणा येथील ऊस तोडणी मजुर रोहिदास किसन पवार यांचा अपघाती मृत्यु झालेला होता. अपघात झालेल्या तोडणी मजुरांचे कुटुंबियांकडून विमाक्लेमसाठी आवश्यकत्या कागदपत्रांची पुर्तता व सतत विमा कंपनीकडे पाठपुरावा करुन कारखान्याने विमाक्लेम सादर केला होता. सदर मंजुर झालेल्या विमाक्लेमची रक्कम रुपये तीन लाखाचा चेक मयत वारसाचे पत्नी शिला रोहिदास पवार यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी ऊस तोडणी मजुर, वाहतुक ठेकेदार बाळु शिंदे, शिवाजी साळुंखे, रामचंद्र मोरे, सभासद, शेतकरी कार्यकर्ते नारायण शिंदे, शालीवान कोळेकर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.