आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल उभारण्यासाठी १३४.७५ लाख रुपये निधीची याचबरोबर मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी १३५.९९ लाख रुपये निधीच्या तरतुदीस शासन निर्णयाद्वारे शासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा येथील वकील मंडळींनी अधिवक्ता संघाच्या वतीने लॉयर्स हॉल उभारण्यात यावे अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली होती.
मतदार संघातील पंढरपूर, मंगळवेढा या दोन्हीही तालुक्यात लॉयर्स हॉल उभारण्यात यावे.यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लायर्स हॉल बांधण्याचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी शासनास सादर केला होता. सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून आमदार समाधान आवताडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून पंढरपुर आणि मंगळवेढा येथे तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी निधीची तरतूद करून घेतल्याने याचा फायदा वकील मंडळी आणि न्यायासाठी दाद मागणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार असल्याने वकील मंडळी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
---------------------------------------------------
मतदार संघातील पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सतत शासन दरबारी सतत पाठपुरावा करून दोन्ही तालुक्यातील लॉयर्स हॉल बांधण्यासाठी २ कोटी ७० लाख निधी मिळवल्याने वकील मंडळी आणि सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
--------------------------------------------------