स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूर (प्रतिनिधी) – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) २०२५ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सोमवार दि.३० डिसेंबर २०२४ पासून ते शनिवार, दि.१५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेल्या व सध्या बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) २०२५ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
बारावी सायन्स नंतर पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएएच- एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी) २०२५ ही परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. एकूणच पीसीएम व पीसीबीच्या या सीईटी परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया
सोमवार दि.३० डिसेंबर २०२४ पासून ते शनिवार, दि.१५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी विद्यार्थ्यांनी स्टेट सीईटी सेलच्या संकेत स्थळाला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी स्वेरी अभियांत्रिकीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.