कुर्डूवाडी पंचायत समिती येथे आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
माढा (प्रतिनिधी) - माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यापासून कामाचा धडाका सुरू केला आहे. पहिल्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मतदार संघातील ५५ प्रश्न आमदार म्हणून अभिजीत पाटील यांनी मांडले आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार अभिजीत पाटील यांनी मतदार संघाचा संपूर्ण आढावा घेतला. सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी माढा पंचायत समिती कुर्डूवाडी या ठिकाणी विविध विभागाची बैठक पार पडली.
तब्बल आठ तास चाललेल्या या बैठकीत प्रामुख्याने रस्ते, वीज तसेच मूलभूत गरजा यावरती चर्चा करून आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकाऱ्यांचे मतदार संघातील नागरिकांच्या मूलभूत गरजांवरती लक्ष केंद्रित केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, माढ्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, एसटी डेपो मॅनेजर तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच मतदार संघासाठी 220 केवी सब स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे बाबत आदेश देण्यात आले.
शासनाच्या विविध योजनेत वंचित घटकांना सामावून घेऊन नागरिकांना योग्य त्या योजनेचा लाभ द्यावा असे आदेश संबंधित विभागाला देण्यात आला. याचबरोबर कृषी विभागातील योजनेचा आढावा घेऊन विविध योजनेसाठी नव्याने फळबागा समाविष्ट करण्या बाबतीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबाबत आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता.
अनेक वर्षांपासून मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेता मतदारसंघातील ग्रामीण मार्ग बाबतीत आराखडा तयार करून तो लवकरच मंजुरीसाठी देण्यात यावा असे आदेश आमदार अभिजीत पाटील यांच्या वतीने संबंधित विभागांना देण्यात आले. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदार संघात अंगणवाडी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून त्याठिकाणी नवीन अंगणवाडीचे कामाला सुरूवात करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले.
सीना माढा प्रकल्पातून येणारे पाणी हे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत संबंधिताबरोबर सकारात्मक चर्चा करण्यात आली. निवडणुकीदरम्यान मतदार संघातील नागरिकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना आ.अभिजीत पाटील हे दिसत आहेत. तब्बल आठ तास चाललेल्या बैठकीत त्यांनी मतदार संघाचा संपूर्ण आढावा घेतला.