पंढरपूर येथे गोसावी समाजाचा वधू-वर पालक मेळावा संपन्न

0
              पंढरपूर (प्रतिनिधी) - येथे दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा व बिजाहोम कार्यक्रम मोठ्या उत्साहाने श्रीगणेश नाथ मंगल कार्यालयात संपन्न झाला.
        शनिवार 11 जानेवारी सायंकाळी ठीक चार वाजता टिळक स्मारक येथून शोभा यात्रेला सुरुवात झाली. डोक्यावर कलश घेतलेल्या महिला भगिनी हातामध्ये ध्वज पताका घेतलेले पुरुष बांधव जोगदंड मठातील वारकरी वेशातील टाळकरी झेंडेकरी सर्वात पाठीमागे रथामध्ये बसलेले चिंचपूर ढगे येथील गोसावी समाजाचे गुरुवर्य तपोनिधी महंत नरेंद्र गिरीजी स्वामी, शांतिगिरी महाराज, महंत समाधान गिरी महाराज होते. ही शोभायात्रा पंढरपुरातील मुख्य शिवाजी चौकातून, प्रदक्षणा मार्ग पूर्ण करून सायंकाळी आठ वाजता सांगता झाली.
              के बी पी चौकातील गणेश नाथ मंगल कार्यालय येथे रात्री नऊ वाजता बिजाहोम गोसावी धर्मसंस्कार शिबिरास मंत्रघोषाने सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता आरतीने सांगता झाली यामध्ये जवळपास 90 समाज बांधवांनी धर्मसंस्कार करून घेतले.
                रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ह भ प शंकर महाराज गोसावी, कार्याध्यक्ष संतोष गिरी, खजिनदार लक्ष्मण पुरी, सहखजिनदार अर्जुन पुरी मान्यवरांना स्टेजवर घेऊन आले. वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे गोसावी समाजाचे अखिल भारतीय  गोसावी महासभा दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत श्री सच्चिदानंद गिरी स्वामी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गणेशनाथ संस्थांचे अध्यक्ष अरविंदनाथजी गोस्वामी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डि के गोसावी, दशनाम गोसावी समाजाचे राज्याध्यक्ष पंडित गोसावी, कार्याध्यक्ष धन्यकुमार पुरी, संजय गोसावी, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सुरू झाला.
           सुरुवातीला वीर पिता मुन्नागिरी गोसावी यांनी प्रास्ताविक करताना गोसावी समाजासाठी बहुउद्देश सभागृह, कार्यालय किंवा सांस्कृतिक हॉल, समाजाच्या विविध कार्यासाठी स्वतः ची दहा गुंठे जागा जमीन देण्याचे जाहीर केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते रुद्रांश वधुवर स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कल्याणगिरी यांनी संपादकीय मनोगतांमध्ये वधुवर कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष ह भ प श्री शंकर महाराज गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुलींनी नोकरदार मुलांच्या  बरोबरच शेतकरी मुलांनाही प्राधान्य देण्याचे आवाहन केले. 
            कार्यक्रमांमध्ये 25 राष्ट्रीय सुवर्ण पदकसह महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवणारी कुमारी अंकिता गोसावी, पीएसआय राजेश प्रभाकर गोसावी, एमपीएससी मधून जलसंधारण अधिकारी पदी निवड झालेले सौरभ गोसावी, वेंकटेश गिरी गोसावी, त्याचबरोबर मंत्रालय कक्षा अधिकारी पदी निवड झालेली  सुजाता बिबीशन भारती, एमपीएससी मधून जलसंधारण विभागात उपकार्यकारी अधिकारी पदी निवड झालेले विनाल राजेंद्र गोसावी, सरळ सेवेमधून न्यायालय परीक्षा उत्तीर्ण झालेली सायली गोसावी, राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड मिळवणाऱ्या स्नेहलता गिरी मॅडम यांनाही सन्मानित करण्यात आले.
              वीर माता वृंदाताई गोसावी, स्नेहलता गोसावी, सायली गोसावी यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.  
                 दुपारी सर्व समाज बांधवांच्या जेवणानंतर वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी 248 मुलांनी आणि 92 मुलींनी स्टेज वरती येऊन आपला परिचय करून दिला. लातूरचे फॉरेस्ट ऑफिसर शिवाजी गिरी यांनी पंढरपूरच्या वधू वर मेळाव्यामध्ये माझ्या मुलीला चांगला वर मिळाल्याचे मनोगतामधून कबुली दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर भारती, वकील दादा  सचिन गिरी, गजानन गोसावी, सुधाकर गोसावी, महेश गोसावी, विजय भास्कर पुरी,  अनिल बन गोसावी, संजय गोसावी, अमित गोसावी, उद्धव बंन गोसावी, नवनाथ गोसावी, वाखरी सेवागिरी गोसावी, संभाजी गिरी, संजय पुरी, शांताराम पुरी, विनायक बन, रतन गिर गोसावी, राजकुमार गोसावी, निनाद गिर गोसावी, सतीश बलभीम गोसावी, हेमंत गोसावी, प्रसाद पुरी, दीपक गोसावी, आशुतोष गोसावी, विक्रम बन ,अंकुश गोसावी, नवनाथ गिरी, नाना मालक गोसावी, नंदकुमार गोसावी, भीमराव गोसावी, भगवान गोसावी, वस्ताद सुनील गोसावी,  राजू गोसावी, कैलास गोसावी, इत्यादी समाज बांधवां बरोबरच शिल्पा गोसावी, रजनी गोसावी ,सुनीता गोसावी, नेहा गोसावी, मंगलपुरी, सुरेखा गोसावी, कविता गोसावी, ललिता बन, राजश्री बुवा, माया गोसावी, पूनम भारती, स्नेहल गोसावी, शैला गिरी, नंदा बन ,शकुंतला पुरी, रंजना पुरी, माया बन, वनिता गिरी, आरती गिरी, शिवानी गोसावी, श्रद्धा गोसावी, मनीषा पुरी, पद्मिनी बन, लक्ष्मी बन, वनमाला बन, शुभांगी गिरी, अंजना भारती, अनुपमा गोसावी, चंद्रकला गोसावी, रेणुका गोसावी या भगिनीं बरोबरच पंढरपूर शहर ग्रामीण भागातील बांधव बरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बुवा आणि रमेश गिरी यांनी केले. अविनाश गोसावी यांनी आभार मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)