पंढरपूर दि.24 :- पंचायत समिती, पंढरपूर सन 2024-25 ची आमसभा गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. असे गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी कळविले आहे.
सदरची आमसभा आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार समाधान आवताडे, आमदार राजु खरे, तसेच आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केलेली आहे.
या आमसभेसाठी प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहितीही गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी दिली.