हृदयरोग तपासणी काळाची गरज - डॉ. बसवराज सुतार

0
सांगोला येथील शिबिरामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांची हृदयरोग तपासणी

           सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला लायन्स क्लब, विद्यामंदिर परिवार व हृदय स्पंदन हॉस्पिटल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  हृदयरोग तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले.
           यावेळी उद्घाटन प्रसंगी हृदयस्पंदन हॉस्पिटल पंढरपूरचे डॉ. बसवराज सुतार यांनी हृदयरोग तपासणी शिबिर ही काळाची गरज असून आजच्या धावपळीच्या युगामध्ये हृदयाचे विकार वाढत चालले आहेत. त्याची पूर्वीच जर तपासणी करून घेतली तर मनुष्य दीर्घायुषी होईल असे मत व्यक्त केले. 
          यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड, लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर, सचिव अजिंक्य झपके तसेच सांगोला विद्यामंदिर  उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश मम्हाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे, लायन्स क्लब संचालक डॉ.शैलेश डोंबे, उपाध्यक्ष हरिदास कांबळे, ला.सुमन कांबळे  उपस्थित होते.
          पुढे बोलताना डॉ. सुतार म्हणाले हृदयविकाराचे अनेक रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. कामाचा तणाव, बाहेरचे खाणे तसेच मानसिक आजार यामुळे देखील हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून ५० शिक्षक व सांगोला नगरीतील नागरिकांनी  लाभ घेतला आहे. हे त्यांच्या  आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 
           याप्रसंगी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला  शिक्षक, कर्मवृंद व ह्रदयस्पंदन हॉस्पिटल मधील महेंद्र कांबळे, ओंकार सुतार, कोमल पांढरे, अजय कदम ,अविनाश भोसले व लायन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर तटाळे यांनी केले तर उन्मेश आटपाडीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)