पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लोटस महाविद्यालय या ठिकाणी शेवटच्या डिग्री वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापिका, मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवीन कायदे बाबत कार्यशाळेचे आयोजिन करून भारतीय न्याय संहिता 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 भारतीय साक्ष अधिनियम 2023 याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन आज रोजी करण्यात आले.
तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्टीत, बँक मॅनेजर यांना समक्ष बोलावून नवीन कायद्याविषयी कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली.
सदरचे नवीन कायदे मार्गदर्शन कार्यशाळा माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री. अतुल कुलकर्णी साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री. प्रीतम यावलकर, सोलापूर ग्रामीण मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.