पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी रणभूमी क्रीडा महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य. डॉ. बी.एस.नाईकनवरे यांनी महाविद्यालयातील मुलांमध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्त्व वाढवायला हवे असे वक्तव्य केले.
यादरम्यान बोलत असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दररोज किमान ६० मिनिटे शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. व बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली शारीरिक हालचाल मिळत नाही. महाविद्यालयातील विद्यार्थी हे शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहण्याऐवजी त्यांचा बहुतांश वेळ बैठे जीवनशैलीत व मोबाईल पाहण्यात जातो. यादरम्यान त्यांनी काही संशोधनातून पुढे आलेले आकडे विद्यार्थ्यांसमोर मांडले यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी दररोज सरासरी ५ ते ६ तास स्क्रीन समोर घालवतात व वाढत्या बैठीशैलीमुळे मुलांच्या मध्ये लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या आरोग्य समस्या वाढत आहेत याचे स्पष्टीकरण दिले. व या समस्या पासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेशी झोप, योग्य आहार, योग, व दररोज व्यायाम याचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकळस, डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत. डॉ.अनिल चोपडे, व जिमखाना विभागाचे सर्व सदस्य महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. बी.के.सुडके यांनी केले.
या रणभूमी क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी मैदानी स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, व सांघिक खेळामध्ये खोखो, कबड्डी, रस्सीखेच, क्रिकेट, व्हॉलीबॉल, अशा विविध खेळाचे आयोजन जिमखाना विभाग मधील प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले व जिमखाना कमिटी तर्फे करण्यात आले.