पंढरपूर येथे बत्तीस किलो गांजा, हुंडाई कार जप्त

0

चौदा लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई

            पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथे ३२ किलो गांजा व एक कार सह १४ लाख, ४२, हजार ६८० रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदार हे व्हिआयपी बंदोबस्ताचे अनुशंगाने पंढरपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मंगळवेढा पंढरपुर जाणारे रोडवरील लिंगायत स्मशानभुमी समोर रोडवर अंधारे जागेत एक पांढरे रंगाची हयुंदाई कंपनीची आय २० गाडी नं एमएच १३ बीएन ९६२२ ही गाडी रात्रौ पावणे अकरा वा. चे सुमारास संशयास्पद रितीने उभी असलेली दिसली. सदर गाडीचा संशय आलेने संशयित गाडीस पोलीस स्टाफ यांनी गराडा घातला व गाडी चालकास व त्याचेसोबत मागील सीटवर गाडीत आणखीन तीन महिला बसलेल्या दिसल्या.

             सदर संशयितांकडे अधिकची चौकशी केली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये काही सिलबंद पॉकेट दिसली. सदर गाडीतील सिलबंद पाकीटे पाहता त्याचा उग्र व आंबट वास येत असलेने सदरची पांढरे रंगाची हयुंदाई कंपनीची आय २० गाडी नं एमएच १३ बीएन ९६२२ ही गाडीसह संशयित तीन महिला व एक पुरुष यांना पुढील चौकशीकामी पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे आणुन अधिकची चौकशी केली असता सदर गाडीमध्ये तब्बल ३२.१३४ किलो ग्रॅम वजनाचा ६, लाख ४२, हजार ६८०/- रू किं.चा गांजा असलेने त्यांचेविरोधात  गुन्हा दाखल केला असुन यामध्ये ३ महिला व १ पुरूष आरोपीसह चार आरोपीना अटक केलेले आहे.

          सदरची उल्लेखनीय कामगीरी  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर  उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, डॉ. अर्जुन भोसले  व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी आशिष कांबळे, श्रेणी  राजेश गोसावी,  शरद कदम, कल्याण ढवणे, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, पोलीस नाईक सचिन इंगळे,  शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे,  रेश्मा सांगोलकर सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे तसेच पुढील तपास सपोनि भारत वाघे हे करीत आहेत.

           या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा गांजा पकडला असून याआधी डी मार्ट येथे लाखो रुपये किंमतीचा गांजा व कार जप्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)