सांगोला लायन्सकडून माजी प्रांतपाल सत्कार संपन्न
सांगोला (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना व लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणकारी कार्यात मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, गरजूंना व अपंगांना वैद्यकीय उपचार शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाला समाजऋण म्हणून सेवाकार्यातून समाजकार्य करता येईल.असे प्रतिपादन माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.
लायनिझममध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात माजी प्रांतपाल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून माजी प्रांतपाल यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो.यानुसार सांगोला लायन्स क्लबकडून माजी प्रांतपाल ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा तुळशीचा हार, शेला व स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देऊन क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. उन्मेश आटपाडीकर, सचिव ला. अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य ला.अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका ला. शहिदा सय्यद उपस्थित होते.
पुढे बोलताना ला.प्रा. झपके यांनी लायन्स मधील रुजलेली लोकशाही, विविध उपक्रम, सेवाकार्य, समाजहितासाठी उपलब्ध होणारा निधी या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. व सत्कारासाठी सांगोला क्लबला धन्यवाद दिले.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी, सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कॅबिनेट ऑफिसर ला. प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले .