प्रवाशांना तिळगूळ वाटप
पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तिळगूळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्टेशन प्रबंधक के. के. मिश्रा होते.
प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी केले.जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी प्रवासी दिन साजरा करण्यामागील हेतू स्पष्ट केला. जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी किसान रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली. स्टेशन प्रबंधक के. के. मिश्रा यांनी रेल्वेतर्फे सुरू असलेल्या विविध कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रवासी सेवेतील त्रुटी, अपेक्षित सुधारणा आमच्यापर्यंत पोहोचवा त्या निश्चितपणे सोडविण्यात येतील अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी ग्राहक पंचायतीचे सदस्य राजु ऐनापुरे, श्री व सौ. रेखा चंद्रराव, तिकीट तपासणीस, स्वच्छता दूत, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी, रेल्वे प्रवाशांना तिळगूळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य व्यवस्थापक अमोल जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.