राजसाहेब ठाकरे यांच्याहस्ते पंचतारांकित हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मोठ्या दिमाखात उद्-घाटन

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) -- हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार अभिजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, मनसेचे अविनाश अभ्यंकर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी, ज्येष्ठ नेते नानासाहेब कदम, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, यांच्यासह पंढरपूर शहरातील आजी-माजी नगरसेवक व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
           विठुरायाची पावनभूमी पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मुंबई पुण्याच्या धरतीवर टेंभुर्णी-पुणे रोड करकंब तालुका पंढरपूर येथे पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची निर्मिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून धोत्रे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. 
       हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची १ लाख ४ हजार स्क्वेअर फुट जागेत निर्मिती करण्यात आली आहे. 
यामध्ये ५० रूम, तीन हजार स्क्वेअर फुटचा प्रशस्त हॉल, पंचवीस हजार स्क्वेअर फुट लॉन गार्डन, स्विमिंग पूल, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. 
याचबरोबर या ठिकाणी हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची मुंबईच्या धरतीवर निर्मिती करण्यात आली आहे. 
          यामध्ये पंचतारांकित हॉटेल प्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत. याद्वारे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे. 
       सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजीक असलेल्या पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंट भाविक व नागरिकांसाठी खुले झाले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)