नीरानरसिंहपूर (ता. इंदापूर) (प्रतिनिधी) - येथील श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सववर्षपुर्ती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा दि. १ ते ७ फेब्रुवारी २०२५ अखेर भव्य प्रमाणात संम्पन्न झाला. या सोहळ्यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांनी आपली सेवा समर्पित केली.
या सोहळ्यामध्ये श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज श्रीगुरु बापूसाहेब देहूकर महाराज, ह भ प आनंद महाराज काकडे, ह भ प ॲड श्री पांडुरंग महाराज लोमटे, ह भ प मच्छिंद्र कावडे महाराज, ह भ प श्रीकांत आरोळे महाराज, ह भ प अंकुश महाराज रणखांबे., तसेच काल्याची कीर्तन सेवा संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्री गुरु बाळासाहेब ज्ञानेश्वर देहूकर यांचे पुतणे श्री कान्होबा महाराज यांनी सेवा केली. तसेच प्रवचनामध्ये ह भ प राजाभाऊ आवटी ,.ह भ प शामराज दंडवते, ह भ प सुग्रीव महाराज मिटकल गुरूजी, ह भ प सुभाष शास्त्री जपे, ह भ प धनंजय दुनाखे सर, ह भ प मारुती महाराज घाडगे आदिनी आपली प्रवचनाची सेवा समर्पित केली.
या सप्ताह काळामध्ये गावातील प्रमुखांनी अन्नदान वारकरी सेवा केली. यामध्ये लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने संपूर्ण मंदिरामध्ये मंडप व्यवस्था व लाईट डेकोरेशन करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यांमधून हा सोळावा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पुर्ण झाला आहे असे या सप्ताह सोहळ्याचे संयोजक ह भ प अंकुश रणखांबे महाराज व ह भ प आनंद काकडे महाराज यांनी सांगितले. सप्ताहात श्रीलक्ष्मी नृसिंह वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते..