श्री.भारत गदगे सर यांना सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार
सोलापूर (प्रतिनिधी) - पंढरपूरचे सुप्रसिद्ध चित्रकार लोकमान्य विद्यालयाचे मा.पर्यवेक्षक श्री.भारत गदगे सर यांना सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. किर्लोस्कर सभागृहात हि.ने.वाचनालय येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यांना प्राचार्य श्री. सुधीर देवरकोंडा, मा.गोपाळराव डांगे, मा. भंवर राठोड, डिझाइनचे व्यवस्थापख धर्मेश टंक, मुख्या. गोपीनाथ नवले, मा.सतीश सुभेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार रविवार दि. ९ मार्च रोजी प्रदान करण्यात आला.
श्री. भारत गदगे सर हे पंढरपूरचे उत्तम चित्रकार असून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नामांकित कला दालनांमध्ये कैक वेळा भरविले गेले आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणीचे सुंदर अशा प्लँस्टरच्या मूर्ती कैक ठिकाणी पहायला मिळतात. राष्ट्रपती व राजभवनात ही त्यांच्या चित्रांना स्थान मिळाले आहे. कैक शास्त्रीय संगीत कार्यक्रम चालू असताना त्यांनी अनेक गायक वादकांची तिथेच चित्रे काढून त्यांना भेट दिली आहेत. चित्रकार म्हणून ते तर प्रसिद्ध तर आहेतच पण एक चांगले मित्र, शिक्षक म्हणून ते आपल्या मित्र कंपनीमध्ये प्रसिद्ध आहेत. अशा योग्य शिक्षकाचा, चित्रकाराचा सन्मान झाल्यामुळे पुरस्कार देणाऱ्या संस्थेचाच नावलौकिक वाढलेला आहे असे वाटते.
श्री.भारत गदगे सर यांना "जीवन गौरव पुरस्कार" मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.