हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटचं करू शकते; सर्व स्तरातून फॅबटेकच्या निर्णयाचे स्वागत
सांगोला (प्रतिनिधी) - विविध बँका, मल्टीस्टेट, पतसंस्था यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी सध्या मार्च अखेरमुळे मोठा धुमधडाका सुरू असताना, नामवंत फॅबटेक मल्टीस्टेटने एक दोन नव्हे तर तब्बल 90 मयत कर्जदार महिलांचे 57 लाख 19 हजार रुपयांचे कर्ज माफ करून फॅबटेक मल्टीस्टेट ने माणूसकी जपली आहे. सदर कर्जदार मयत महिलांच्या नातेवाईकांना महिला दिनाचे औचित्य साधून कर्जमाफीचा दाखला देखील देण्यात आला आहे. ना जीआर, ना घोषणा, थेट अंमलबजावणी हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटचं करू शकते यानिमित्ताने फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे.
घरातील एखादा कर्ता पुरुष अचानक गेल्यानंतर त्या कुटुंबाची मोठी हानी होत असते. पण त्याच्यामागे घराची सर्व जबाबदारी त्या घरच्या महिलेवर येत असते, परंतु कुटुंबातील महिलेचे जर काही बरे वाईट झाले तर त्या घराचा आधारच नाहीसा होतो, त्यातच जर एखाद्या वित्तीय संस्थेचे कर्ज संबंधिताकडे असेल तर त्या कुटुंबाची आणखी अडचण होते. घराचा मुख्य माणूसच नाहीसा झाला तर त्या कुटुंबाची होणारी आर्थिक कोंडी, घरावर ओढवणारे सावट यासर्व गोष्टींची सामाजिक जाणिव लक्षात घेऊन सांगोल्यातील फॅबटेक मल्टीस्टेटने आपल्या कार्यक्षेत्रातील एकूण 90 मयत कर्जदार महिलांचे थकीत पडलेले 57 लाख 19 हजार रुपयांचे कर्ज माफ करीत त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार देण्याचे काम केले आहे.
फॅबटेक मल्टीस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सांगोला ही वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असूनही नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय आजवर घेतले आहेत. यासाठी संस्थेने स्वतःच्या नफ्यातील स्वनिधितून अशा सामाजिक उपक्रमासाठी निधी देत असते, यातूनच वरील कर्ज माफ करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात 30 शाखा कार्यरत असून या वेगवेगळ्या शाखेतून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासह महिला आर्थिक सक्षमीकरण व्हावे व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लागावा म्हणून कर्ज वाटप केले जाते. यामधून महिलांनी वेगवेगळे उद्योग निर्मिती करून उद्योग व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. यामधील 90 मयत कर्जदार महिलांचा समावेश होता. यासर्वच महिला कुटुंबातील कर्त्या स्त्री होत्या. त्यांच्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते. त्याचवेळी फॅबटेक मल्टीस्टेट को – ऑ क्रेडिट सोसायटी लि.सांगोला” संस्थापकीय चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर यांनी सांत्वन भेटीवेळी संस्थेने त्यांचे कर्ज पूर्ण सुरक्षित केले आहे. तुम्ही काळजी करू नका, असा धीर दिला. त्यामुळे कुटुंब व नातेवाईक यांनी संस्थेचे आभार मानले. संस्था आमच्या अडचणीच्या वेळी अगदी देवासारखी धावून आली, असे उद्गार संबंधित 90 कुटुंबातील नातेवाईकांनी काढले.
यावेळी “फॅबटेक मल्टीस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सांगोला” या संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर यांनी शुद्ध हेतु व दूरदृष्टी ठेवून संस्था स्थापन केली. गोरगरिबांची प्रत्येक पै ना पै सुरक्षित राहिली पाहिजे, शोषित, वंचित घटकाला संस्थेचा लाभ झाला पाहिजे, सभासदाने कर्जात गुरफटून राहण्यापेक्षा कर्ज घेवून उद्योग उभारुन प्रगती करावी व जीवनमान उंचवावे, हा त्यांचा आग्रह राहीला आहे. अडचणीच्या वेळी अथवा कर्जदार मयत झाल्यास त्याची झळ कुटुंबाला बसू नये, कुटुंब उद्ध्वस्त होवू नये म्हणून त्यांच्या दूरदृष्टीने स्वनिधितून अशा सभासदांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासह सभासदांना वार्षिक 15% लाभांश देणारी व 35 हजार महिलांना आर्थिक सहकार्य करत आर्थिक सक्षम बनविण्यासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील एकमेव संस्था आहे. सोने तारण व सोने खरेदीसाठी प्रती तोळा रू 75 हजार रुपये कर्ज सहाय्य केले जाते. ठेवीवर ही आकर्षक असे 12 टक्के व्याज दिले जाते. यामुळे फॅबटेक मल्टीस्टेट ठिकठिकाणी अर्थकारणात गरुड झेप घेत आपला 500 कोटींचा व्यावसायिक टप्पा पार करत आहे. यामध्ये संस्थेने कर्जदार, ठेवीदार व खातेदार यांची विश्वासार्हता जपली आहे. यापुढेही जपली जाईल असा विश्वास फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले आहे.
---------------------------------------------------
फॅबटेक मल्टीस्टेटने नेहमीच सभासदांना उत्तम सेवा देण्याचा मानस ठेवलेला आहे, आणि त्याप्रमाणे आपण आजवर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. सहकाराअंतर्गत सहकार या तत्वानुसार “फॅबटेक मल्टीस्टेट” ही संस्था आपली जबाबदारी घेत आहे.
मा. डॉ. सूरज रुपनर
व्हा. चेअरमन, फॅबटेक मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसयटी लि. सांगोला जि. सोलापूर
---------------------------------------------------
“फॅबटेक मल्टीस्टेट” ही संस्था 500 कोटींच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल करत असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकूण 30 शाखा कार्यरत आहेत, जिथे सर्वसामान्य व वंचित घटकांचा, त्यांच्या आर्थिक सक्षमतेचा विचार पहिला केला जातो, त्यासाठी योग्य त्या कर्जसुविधा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करत असतो, आणि याचा बऱ्याच महिलांना व लघु उद्योजकांना आजवर फायदा झालेला आहे, यापुढेही होत राहणार आहे, सर्वसामान्यांच्या प्रगतीत आमच्या “फॅबटेक मल्टीस्टेट”ची प्रगती दडलेली आहे,
मा. भाऊसाहेब रुपनर
संस्थापक चेअरमन – फॅबटेक मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटी लि. सांगोला, जि. सोलापूर
---------------------------------------------------