कर्मयोगी इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक एस. एम. लंबे यांना पीएचडी प्रदान

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सोमनाथ मुरलीधर लंबे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
             'प्रोटेक्टींग पॉवर फॅक्टर करेक्शन कॅपॅसीटर्स फ्रॉम ओव्हर होल्टेज कॉजड बाय हार्मोनिक्स युजिंग ऑटो ऍडजेस्टेबल हाय क्यू फिल्टर' या विषयांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले.
              विशेष महत्त्वाची बाब म्हणजे केवळ तीन वर्षांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले याबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष कौतुक होत आहे.
           श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, 'ऋतुरंग २०२५'  या कार्यक्रमाचे चे प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद परिचारक यांच्या हस्ते प्राध्यापक सोमनाथ लंबे यांचा गौरव करण्यात आला.
           यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार जी. डी. वाळके, कर्मयोगी समूह अंतर्गत असणाऱ्या नर्सिंग, फार्मसी, जुनियर कॉलेजचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)