सोलापूर विद्यापीठात स्वेरी फार्मसीचा झेंडा

0
पहिल्या ०३ रँकमध्ये ०२ विद्यार्थी स्वेरीचेच !

          पंढरपूर (प्रतिनिधी) - शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरकडून घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष फार्मसीच्या अंतिम सत्राच्या परीक्षेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून विद्यापीठाच्या पहिल्या ३ रँकमध्ये २ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. त्यामुळे उज्ज्वल निकालाची परंपरा यंदा देखील कायम राखली असून पंढरपूरच्या स्वेरीचा झेंडा पुनःश्च दिमाखात फडकला आहे.  

         तंत्रशिक्षणातील 'पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन', उत्कृष्ट प्लेसमेंट, उत्कृष्ट संशोधन सुविधा, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट मानांकने आणि आदरयुक्त शिस्त या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीची सध्या सुरू असलेली दैदीप्यमान वाटचाल होय. या सर्व बाबींकडे स्वेरीच्या व्यवस्थापनाचे व प्राध्यापकांचे विशेष लक्ष असल्यामुळे सोलापूर जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्रातील पालकांच्या मनात स्वेरीचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्याच्या स्वेरीच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या स्थानावर पुजा मुथ्यमराज बत्तुल विराजमान झाल्या तर द्वितीय क्रमांक उत्कर्षा रामचंद्र कोरके यांनी पटकाविला. विशेष म्हणजे तब्बल ३५ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. स्वेरीतील नियमित राबविली जाणारी रात्र अभ्यासिका, अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, सुसज्ज व संदर्भ ग्रंथ असलेले भव्य वाचनालय, अभ्यासासाठी व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मुबलक संदर्भ पुस्तके आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य या महत्वाच्या बाबींमुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेच्या निकालात गरुड झेप मारली आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार यांच्यासह सर्व वर्गशिक्षक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीच्या पदवी प्रदान सोहळ्यात पद्मश्री अवार्ड विजेते डॉ. संजय धांडे यांच्या हस्ते व आयसीटी चे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भास्कर थोरात यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुजा यांचा आई सौ.तेजल बत्तुल व वडिल मुथ्यमराज बत्तुल यांच्या समवेत सत्कार करण्यात आला.
         यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)