अरण सब स्टेशनची क्षमता दुप्पट वाढवल्याने नागरिकांमध्ये समाधान
माढा (प्रतिनिधी) - अनेक वर्षांपासून माढा मतदार संघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी याचबरोबर शेतकऱ्यांना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने आमदार अभिजीत पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून अरण येथील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याकडे गांभीर्याने लक्ष घालून आमदार अभिजीत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून अरण येथील ५ के.व्ही.सबस्टेशनची क्षमता दुप्पट केली असून या सब स्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी आमदार पाटील यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या सब स्टेशनची क्षमता दुप्पट झाल्याने अरण गावासह तुळशी, जाधववाडी, बैरागवाडी या गावांतील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याने समाधान व्यक्त केले.
पुढील काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांबाबत चर्चा व्यथा मांडल्या आहेत. लवकरच त्याचा देखील पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मा.जि.प.सदस्य भारत शिंदे, चंद्रकांत आबा गिड्डे, एकनाथ सुर्वे, हरिदास रणदिवे, शरद मोरे, नारायण माळी, प्रमोद कुटे, बालाजी पाटील, यशवंत शिंदे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..