आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळाले

0
आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

           माढा (प्रतिनिधी) - माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे मोडनिंब शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडनिंब शहराला पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असल्याने नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..
             मोडनिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले.
           या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य श्री. भारत आबा शिंदे, श्री. आनंद पाटील, डॉ.श्री.सागर गिड्डे, श्री.बाळासाहेब पाटील, श्री.बालाजी पाटील, श्री.शिवाजीराजे सुर्वे, श्री.दिपक सुर्वे, श्री.गौतम ओहोळ, श्री.गोटु शिंदे, श्री.विजयसिंह गिड्डे, श्री.संतोष मुटकुळे, श्री.संभाजी काळे, श्री.अख्तरभाई तांबोळी, श्री.आकाश कोळी, श्री.संभाजी लादे, श्री.नंदकुमार लादे, श्री.प्रकाश कोळी, संचालक श्री.संदीप खारे, श्री.सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यां चे आभार व्यक्त केले.

            मोडनिंबसाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असे देखील आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)