कै. तुकाराम कांबळे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने ३६५ झाडांचे वाटप
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
पंढरपूर (प्रतिनिधी) - करकंब येथील कै. तुकाराम बाबू कांबळे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्याना वेळी वसंतराव हंकारे बोलत होते. सुरुवातीला आईसाहेब भागिरिथी कांबळे, वसंतराव हंकारे, धनाजी कांबळे, जयश्री कांबळे, प्रसन्न अथर्व कांबळे, श्रध्दा कांबळे, शरदचंद्र पांढरे, राहुलकाका पुरवत, अमोलदादा शेळके, सतिश देशमुख, ज्ञानेश्वर दुधाणे, सचिन शिंदे, अमर चव्हाण, प्रा.किसन सलगर, यांच्या उपस्थितीत विठूरायाच्या आणि कै. तुकाराम कांबळे यांचे प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व कांबळे परिवार आणि वसंत हंकारे यांचे शुभहस्ते बेलाच्या झाडाचं वृक्षारोपण केले आणि वृक्षप्रेमींना ३६५ झाडांचं वाटप करण्यात आले. त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात झाली.
त्यामध्ये उपस्थित हजारो करकंबकर ग्रामस्थांना सांगितले की, आई- वडील हेच खरे आपले दैवत असून त्यांना कधीच मान खाली घालण्यासारख वागू नका. आई वडील जन्मापासून हाताच्या फोडागत संभाळतात. आपण त्यांना म्हातारपणी त्यांचा आधार बनला पाहिजे. त्यांच्यामुळे आपण सुंदर जग पाहू शकलो हे विसरु नका. त्यांच्याशी प्रेमाने बोला. एखाद्यावेळी 'मिठी मारा बस हिच अपेक्षा' त्यांची असते. आपल्या जीवनातील सगळी कष्ट बाजूला सारुन मुलांसाठी वाटेल ते करतात. मुलगा मुलगी कशीही असली तरी आई वडीलांना ती प्राणप्रिय असतात आणि तिच आपली खरी दैवते आहेत याचा विसर पडू न देता जिवंत असतानाच त्यांच्या इच्छा पूर्ण करा. यावेळी करकंब आणि करकंब पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी कांबळे आणि कांबळे परिवारा बरोबर तसेच अरुण कुंभार, गोपाळ कुंभार, गणेश नरसाळे, औंदुबर कुंभार, अशोक कुंभार, गजानन शिंदे, बंडू अभंगराव, तसेच संत रोहिदास महाराज व संत गोरोबा काका सामाजिक संघटना यांनी अधिक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब कुंभार आणि खांडेकर सरांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मानले.