प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुन्हा नवीन घरकुलांचे सर्वेक्षण..!

0
मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा - आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन

              पंढरपूर (प्रतिनिधी) - एक एप्रिल पासून राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ सुरू होणारा असून मतदारसंघातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या योजनेमध्ये आपली नोंदणी करावी ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्यामार्फत ही नोंदणी होणार असून यामध्ये काही अडचणी आल्यास किंवा जाणून-बुजून कुणी कोणाच्या सांगण्यावरून राजकीय दबावातून एखाद्या पात्र लाभार्थ्याला वगळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला केले आहे .
            पहिल्या टप्प्यातील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया येत्या १ एप्रिल २०२५ पासून ग्रामपंचायतीच्या मदतीने सुरु होत आहे. या योजनेपासून मतदार संघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी तात्काळ संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण २०१८ मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले, प्रक्रियेद्वारे अपात्र ठरलेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांचे योजनेच्या या दुसऱ्या टप्प्यात नव्याने सव्र्व्हेक्षण करण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. हे सर्वेक्षण मोबाईल अॅपमध्ये करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सर्वेक्षक यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. मतदार संघातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली असून येत्या १ एप्रिलपासून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसह नवीन लाभार्थ्यांनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ घ्यावा, यातून काही अडीअडचणी आल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आमदार आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)