विधानपरिषदेसाठी मा. आ. प्रशांत परिचारक व मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या नावाची चर्चा

0
सोलापूर जिल्ह्यातून  मा. आ. प्रशांत परिचारक व मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या नावाची मोठी चर्चा

           पंढरपूर (प्रतिनिधी)  -  विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षामध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली असून सोलापूर जिल्ह्यातून  माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नावाची मोठी चर्चा होत आहे.
          माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी देऊन पक्ष त्यांचे पुनर्वसन करणार का ? हे पाहणे यानिमित्ताने औत्सुक्याचे ठरणार आहे.
            विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या पाच जागांमध्ये भाजपच्या तीन, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रत्येकी एक-एक जागा आहेत. येत्या २७ मार्च रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली असून  माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे.
         सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार रामभाऊ सातपुते व  प्रशांत परिचारक यांचं नाव विधानपरिषदेसाठी सर्वत्र चर्चेत आहे. विधानपरिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत. 27 मार्चला निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी देऊन पक्ष त्यांचं पुनर्वसन करणार का, हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)